बाणेर मध्ये महापालिकेनेच अतिक्रमण करून खाजगी जागेत उभारला कचरा प्रकल्प; सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याने प्रकल्पा विरोधात नागरिक करणारा आंदोलन

बाणेर : पुणे महानगरपालिका बाणेर सुस रोड येथील कचरा प्रकल्पासाठी गेले नऊ वर्ष माझी जागा बेकायदेशीर व अनाधिकृत रित्या वापरत असून जागेचा वापर त्वरित थांबवण्यात यावा यासाठी पुणे महानगरपालिकेला वारंवार अर्ज करूनही याची योग्य दखल घेत नाही तसेच कुठलाही मोबदला मला देण्यात आलेला नाही पालिकाच खाजगी जागेत अतिक्रमण केले असल्याची बाब यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

बाणेर येथील सर्वे नंबर ४८/२/१ मध्ये पुणे महानगरपालिकेने घनकचरा प्रकल्प उभारला आहे. पुणे महानगरपालिकेचे १०.८६ गुंठे एवढेच क्षेत्रफळ सातबारावर असताना या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाचे जागा ताब्यात नसताना खाजगी जागेवर प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाला रस्ता देखील ताब्यात न घेता खाजगी जागेतून वाहतूक केली जात आहे. पालिकेनेच अतिक्रमण केल्यामुळे कारवाईसाठी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला असून या कचरा प्रकल्पाचा त्रास या परिसरातील नागरिकांना देखील सहन करावा लागत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.

या प्रकल्पाचा नागरिक वसाहतीमध्ये असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडे देखील वारंवार केली यावेळी प्रशासनाने प्रकल्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन देखील दिले. परंतु कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर प्रकल्पाची जागा बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन कुठलाही मोबदला न देता नऊ वर्ष जागेचा वापर प्रकल्पासाठी केला जात आहे. प्रकल्पाला रस्ता नसताना खाजगी जागेतून बेकायदेशीर काँक्रीट रस्ता करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करून पालिकाच खाजगी जागांमध्ये अतिक्रमण करत असेल तर कारवाई कोणावर करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत पुणे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये रविवारी एक जून रोजी मानवी साखळी करून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी सुस रोड बाणेर विकास मंचचे विनायक देशपांडे, हरीश पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, राशिनकर , मोहोळकर आदी उपस्थित होते.

See also  "अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला महिलांच्या ताब्यात द्या, त्या त्याचा योग्य समाचार घेतील.. खासदार मेधा कुलकर्णीं आक्रमक