एका महिन्यात 3 वेळा काम तरीही चेंबर नादुरुस्त पुणे पालिकेचे काम

पुणे : दत्तनगर जांभुळवाडी रोडवर गवळीवाडा येथील पावसाळी चेंबरच्या साईटला वारंवार खड्डे पडत आहे. 8 दिवसात 2 वेळा रस्त्यावरील पावसाळी गटाराचे चेंबरचे काम करण्यात आले.

परत एकदा पंधरा ते वीस च दिवसांमध्ये पुन्हा एकदा काम करण्याची वेळ आली, अतिशय अयोग्य पद्धतीमध्ये निष्कृष्ट दर्जेचे काम या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यांच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी कोणीच वाली नाही का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. एकाच महिन्यात तीन वेळा एकाच ठिकाणी काम करावे लागत असल्याने या कामातून नक्की कोणाचे हित साधण्याचे काम सुरू आहे याची चौकशी करण्यात यावी.

नागरिकांना सुविधा देण्याची मोठी जबाबदारी कर्मचाऱ्यांवरती असते, पण पालिका कर्मचारी कुठलेही जबाबदारी प्रामाणिकपणे काम करण्यास तयार नाही. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अधिक अधिक गुंतत आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केला.

See also  २२९ वा "सॅटर्डे क्लब"पुणे मेट्रोमध्ये साजरा