औंध कुस्ती केन्द्रातील पै.अजिंक्य रानवडे व पै.तुषार कडू यांनी बालराज्य अजिंक्य कुस्ती स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक पटकावले

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पहिले बाल राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा  महाळुंगे बालेवाडी क्रीडा नगरी येथे या स्पर्धेत औंध कुस्ती केन्द्रातील पै.अजिंक्य रानवडे व पै.तुषार कडू यांनी सुवर्ण व रौप्य पदक मिळविले.

या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला होता. पै.अजिंक्य च्या 31कि.लो.गटात 177 मुलांचा सहभाग, पै.तुषार च्या गटात ही साधारण तेवढीच मुले होती. औंध केंद्राचे वस्ताद विकास रानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघे सराव करतात.

See also  नगरविकास विभागाने समन्वयाने नवीन धोरण तयार करावे- उपमुख्यमंत्री अजित पवारआझाद मैदान, क्रॉस मैदान व ओव्हल मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात बैठक