पुणे : भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य व मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक श्री. राजेंद्र उत्तुरकर हे तंत्रनिकेतन मधून ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२५ रोजी प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले, त्यांनी भारती विद्यापीठामध्ये कला अकादमीचे संयोजक, भारती सहकारी भांडाराचे संचालक, भारती विद्यापीठ नियामक मंडळाचे सभासद, भारती विद्यापीठ कात्रज संकुलाचे सेक्रेटरी अश्या विविध जबाबदाऱ्या वेळोवेळी सांभाळल्या. भारती विद्यापीठामध्ये होणाऱ्या सर्व मोठ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळल्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तंत्रनिकेतन ने २०१९ साली एन.बी.ए. मानांकन प्राप्त केले होते.
ह्यूमॅनिटीज अँड सायन्स विभागातील फिजिक्स विषयाचे प्राध्यापक श्री उमेश सैंदाणे हे तंत्रनिकेतनमधून ३० नोव्हेंबर २०२४ तर श्री संजय भोसले हे तंत्रनिकेतनमधून ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले,
इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्राध्यापक श्री अरुण पाटील हे तंत्रनिकेतनमधून ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले, मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक श्री काशिनाथ बंडगर हे तंत्रनिकेतनमधून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले, केमिकल विभागातील लॅब असिस्टंट श्री संजय कुंभार हे तंत्रनिकेतनमधून ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.
तंत्रनिकेतन तर्फे वरील सर्व सेवकांकरिता सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन ३१ मे २०२५ करण्यात आले होते ह्या प्रसंगी सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या सेवाकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. उदय पवार व सौ. वैशाली फाळके यांनी तर सूत्रसंचालन सौ. सुजाता पाटील यांनी केले, ऋणनिर्देश सौ. प्रतीक्षा पवार यांनी केले. ह्याप्रसंगी तंत्रनिकेतनमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच तंत्रनिकेतनचे उप प्राचार्य श्री. अमित पाटील व उप प्राचार्य श्री. हृषीकेश देशमुख उपस्थित होते .
घर साहित्य/शैक्षणिक भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन