बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, तुकाई टेकडी स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.
तुकाई टेकडी ही बाणेर परिसरास लाभलेली निसर्गाची अनमोल देणगी आहे. परंतु सध्या या ठिकाणी कचरा, प्लास्टिक, आणि घाण यामुळे तिचे सौंदर्य नष्ट होत असल्याचे दिसून आले होते.
या पार्श्वभूमीवर जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या वतीने याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणयात आली.
यावेळी बाणेर आणि परिसरातील अनेक तरुण सहकारी मित्र-मैत्रिणी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुकाई टेकडी परिसरातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.