पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट गावातील विकास कामे व विविध प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले

पुणे :  पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणारा बारामती मतदारसंघातील भाग आणि महापालिकेच्या समाविष्ट गावांतील विकास कामे आणि विविध प्रश्नांबरोबरच रस्ते आणि सार्वजनिक वाहतुक सुरक्षा याबाबत पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.

यावेळी नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्याबद्दल नवल किशोर राम यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले, तसेच भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल आभार मानले.

याप्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, सचिन दोडके, निलेश निकम, स्वाती पोकळे, भारती शेवाळे, किशोर कांबळे, त्रिंबक अण्णा मोकाशी, सुधीर कोंढरे, स्मिता कोंढरे, दीपक बेलदरे, शरद दबडे पाटील, आनंद मते, प्रभावती भूमकर, निलेश दमिष्टे, हनुमंत शिवूर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

See also  बियाणे, खते खरेदी करताना अशी घ्यावयाची काळजी