पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा मतदार संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते नाना पेठ येथे करण्यात आले. पंधरा हजार वह्यांचे वाटप करताना दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
आमदार सचिन अहिर यांनी याप्रसंगी बोलत असताना म्हणाले, शिवसेना पुणे शहर पदाधिकारी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम हिरीरीने करीत आहे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांना मदतीचा हात देण्यात शिवसेना मागे वळून बघत नाही. जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचे दिलेले वचन पाळत आहे. मदतीच्या हाकेला हात देणारे एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना आहे. कोणत्याही कार्यालयात गेल्यावर न्याय मिळत नाही. तेव्हा शिवसेनेच्या शाखेत गेल्यावर निश्चित आम्हाला न्याय मिळेल हि भावना पुणेकर आणि महाराष्ट्रातील डब्बाजनतेची आहे. पुण्यातील पदाधिकारी सरकार व प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवर वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असताना प्रसंगी जेलला जातात. सत्ताधारी नगरसेवकांना जनतेने निवडून दिले. हे नगरसेवक पुण्याचे सेवक नसून भक्षक बनले आहेत. हे नगरसेवक प्रभागाचा विकास करीत नाहीत तर स्वतःचा विकास करण्यात वेळ घालवतात. म्हणून यांना परत घरी बसवण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या विकास कामासाठी माझा आमदार निधी पुणे शहरासाठी देण्याचा आमचा मानस आहे.
याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, महिला शहर समन्वयक निकीता मारटकर, उपशहरप्रमुख आबा निकम, उत्तम भुजबळ, अजय परदेशी, रोहिणी कोल्हाळ, करूणा घाडगे, विजया मोहिते, राजेश मोरे, राहुल जेकटे, प्रविण डोंगरे, ज्ञानंद कोंढरे, परेश खांडके, रूपेश पवार, बाळासाहेब गरुड, धनंजय देशमुख, सोमनाथ कोकणे, झुबेर तांबोळी, राहुल शेडगे, योगेश वरणे, सुधाकर झाडगे, संजय साळुंखे, मिलिंद पत्की, रविंद्र नलगे, अलिम शेख, बापू हरगुडे, रमाकांत साष्टे, अजय चांदरे, आदित्य हरगुडे, कौस्तुभ पिसाळ, तेजस जावळकर, आकाश खैरे, नरेश लडकत, सचिन शिंदे, हेमंत चुत्तर, मतीन मदार, फारुख मेमन, सादिक सय्यद, साइस्ता शेख उपस्थित होते.