औंध : नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.अरुष चव्हाण(38 किलो.)कांस्यपदक, पै.तुषार कडू (44 किलो.) कांस्यपदक, पै.सार्थक फुगे (38किलो.) ग्रीको रोमन कांस्यपदक या औंध कुस्ती केंद्रातील मल्लांनी महाराष्ट्र राज्य संघात प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवला.
औंध कुस्ती केन्द्रातील 3 पैलवान यांची महाराष्ट्र संघातून निवड झाली होती यातील तिघांनाही मेडल पटकाविले राज्याच्या संघासाठी औंध कुस्ती केंद्रातील मल्लांनी शंभर टक्के यश दिल्याचा आनंद असल्याचे यावेळी वस्ताद विकास रानवडे यांनी सांगितले.
पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केल्याबद्दल तिघांचेही विविध स्तरावर अभिनंदन केले जात आहे.