गरिबीचे चटके सोसल्याने कष्टातून कमावलेल्या पैशांचे मोल अधिक!- नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे भावनिक उद्गार

कोथरुड मधील ५० महिलांना शिलाई मशीन वाटप
कोथरूड : लहानपणी गरिबीचे चटके आम्ही सोसलेत. त्यामुळे लहानपणापासून आम्ही दोघाही भाऊबहिणींनी कष्ट करुन शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे याचे मूल्य अधिक असल्याचे भावनिक उद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मधील ५० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भाजपा कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष शहर चिटणीस कुलदीप सावळेकर, कोथरूड मंडल सरचिटणीस वा महिला आघाडी च्या प्रभारी मंजुश्री खर्डेकर, प्रा. अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुंबरे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, मा. नगरसेविका वासंती जाधव, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, दुष्यंत मोहोळ, अमित तोरडमल यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, माझे वडील मुंबई मध्ये एका मिलमध्ये किटली बॉय होते. तर आई देखील तिथे मजुरी करायची. त्यामुळे आम्हा दोन्ही भावंडांनी गरीबीचे चटके सोसले आहेत. आई वडिलांना अतिशय काटकसर करुन घर चालवायला लागत असल्याने; आम्ही दोघेही बहिण -भाऊ लहानपणापासून कमवा आणि शिका तत्वावर शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे कष्ट करुन मिळवलेले पैशांचे महत्व मला अधिक आहे.

ते पुढे म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारणीची शपथ किल्ले रायरेश्वर येथील मंदिरात घेतली‌. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिटेघर गावाला मी गेल्या काळात दत्तक घेतले होते. या गावातील महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी अनेक उपक्रम राबविले. त्यापैकी काहींनी स्वतः पुढाकार घेऊन गोधडी निर्माण केली. त्यासाठी त्यांना कच्च्या मालासह सर्वतोपरी मदत केली होती. या महिलांनी तयार केलेली गोधडी अतिशय अप्रतिम होती. त्याची परदेशी पर्यटकांनाही भूरळ पडली. त्यामुळे याच्या विक्रीतून तिटेघर मधील महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला. कोथरुडमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांनीही आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जे काही करण्याची इच्छा असेल; ते अवश्य करावे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही दिली

ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यातील ७० कोटी लोकसंख्येत महिलांचा समावेश आहे. त्यांना नेहमीच स्वावलंबी होण्याची इच्छा असते. मात्र, अनेकीच्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. अशा महिलांना मदत करुन, जे आशीर्वाद मिळतात. त्यातून वेगळेच समाधान मिळते, अशी ही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी शिलाई मशीन मिळाल्यानंतर सर्वही महिलांनी आनंद व्यक्त केला. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रुपात कोथरुडकरांना मोठा आधार मिळाला असल्याची भावना यावेळी सर्व ५० महिलांनी व्यक्त केली.‌ कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले. तर भाजपा कोथरुड मंडल महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुंबरे यांनी आभार मानले.

See also  पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू-पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती