बालेवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर, अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन

बालेवाडी : दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हभप श्री. संजय बाप्पु बालवडकर, राहुलदादा बालवडकर व अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे 31 वे वर्ष आहे.

विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी या यात्रेत शेकडो वारकरी भाविक सहभागी झाले. माऊलीचे नामस्मरण करून मोठ्या भक्तिभावाने व पवित्र वातावरणात सदर यात्रा पंढरपूर नगरिकडे रवाना झाली. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला.

याप्रसंगी हभप श्री. संजय बा.बालवडकर (अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट बालेवाडी), हभप श्री.चंद्रकांत महाराज वांजळे, नगरसेवक श्री.अमोल बालवडकर, श्री. राहुल बालवडकर, सौ. आशाताई बालवडकर, ॲड.श्री.शिवाजीमामा जांभुळकर, श्री.आत्मारामआबा बालवडकर, मा. श्री. अनिलतात्या बालवडकर, श्री. राजेशजी विधाते, श्री.अमरजी लोंढे, श्री. शशिकांतजी बालवडकर,  बालेवाडी भजनी मंडळ व बालेवाडी-बाणेर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट सुसगाव च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन