भाजपाची कोथरूड उत्तर विधानसभा मंडलाची कार्यकारणी जाहीर, बालेवाडीला महत्त्वाच्या पदानसह झुकते माप

बालेवाडी : भाजप कोथरूड उत्तर विधानसभा मंडल पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर झाल्या. १५ नवनिर्वाचित मंडल पदाधिकाऱ्यांपैकी ७ पदाधिकारी बालेवाडी भागातील आहे. यामुळे बालेवाडीतील पत्ता हा भाजपा मधील उत्तर विधानसभा मंडलात काम करण्यासाठी महत्त्वाचा आहे हे मात्र अधोरेखित झाले आहे.

भाजपाच्या कोथरूड उत्तर मंडलामध्ये सूस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पंचवटी,पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस रोड,  बाणेर पाषाण लिंक रोड, औंध, विधाते वस्ती, चव्हाण नगर परिसराचा समावेश आहे. भाजपा कोथरूड उत्तर विधानसभा मंडल अध्यक्ष म्हणून बालेवाडी मधील लहू बालवडकर यांची निवड करण्यात आली आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले लहू बालवडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोथरूड उत्तर विधानसभा कार्यकारणी जाहीर झाली. या कार्यकारणी मध्ये महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. तर बालेवाडी मधील बालेवाडी रेसिडेन्शिअल असोसिएशन मध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजपा मधील कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आले आहे. या कार्यकारणीत बालेवाडी परिसरातील सात  म्हणजेच जवळपास निम्म्या सदस्यांना मतदारसंघाच्या कार्यकारणीत जागा मिळाली आहे.

अन्य भागामध्ये लहू बालवडकर यांच्या निकटवर्ती यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली नसल्याने पूर्वीपासून भाजपामध्ये कार्यरत असलेल्या जुन्या निष्ठावंत भाजपाच्या सदस्यांमध्ये मात्र या संदर्भात काहीसा नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

नाराजी व्यक्त करणाऱ्या पाधिकाऱ्यांना “तुम्हाला दिलेले पद पटत नसेल तर नियुक्ती पत्र परत करा, आमच्याकडे बरेच इच्छुक कार्यकर्ते आहेत” असा सज्जड दम भरला जात असल्याचे काही जुन्या संघटनेत काम केलेल्या कार्यकर्त्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले जात आहे. भाजपामध्ये अन्य पक्षातून समाविष्ट झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जुने निष्ठावंत कार्यकर्ते यांना सामावून घेताना नवीन अध्यक्षांना मात्र तारेवरची कसरत करावी लागेल.

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड उत्तर मंडलाच्या अध्यक्षांनी केलेली कार्यकारणी निवड ही  बालेवाडी परिसरात नवीन राजकीय समीकरणे निर्माण करणारी तसेच नवीन नेतृत्वाला पाठबळ देणारी ठरणार  याकडे मात्र सर्वांचे लक्ष वेधले जाणार आहे.

See also  पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली- चंद्रकांतदादा पाटील एआरएआय टेकडीवर येणाऱ्या नागरिकांशी संवाद