आयटी पार्क हिंजवडी मधील विविध समस्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, रस्ते अडवणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा केल्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पुणे : पहाटे सहा पासून अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर आहेत, रस्त्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी अजित पवारच रस्त्यावर उतरले आहेत. विधी मंडळामध्ये बाणेर बालेवाडी हिंजवडी महाळुंगे परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेत वाहतूक कोंडीच्या समस्या तसेच हिंजवडी मध्ये कामाला जाणाऱ्या नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी समस्यांची पाहणी केली.

रविवारी पहाटेपासून, पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या व पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाबाबत स्थळ पाहणी केली. यामध्ये पुणे मेट्रो लाईन ३ – स्थानक क्र. ०६ क्रोमा, हिंजवडी स्थानक क्र. ०३, हिंजवडी स्थानक क्र. ०२, हेलिपॅड सर्कल हिंजवडी, मान रोड, मान गाव, लक्ष्मी चौक व हिंजवडी परिसरातील विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच या भागात साचणारे पावसाचे पाणी, रस्त्याची समस्या, वाहतूक कोंडी यासोबतच इतर विविध समस्या जाणून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अजित पवार म्हणाले, सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला, असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला दिला, रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असं अजित पवारांनी सांगितले.

यावेळी भोर वेल्हे मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड आयुक्त, पी एम आर डी ए चे अधिकारी, तसेच परिसरातील विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ऐ

See also  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी परिसरात होणाऱ्या.‘महादुर्ग’ महोत्सव पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा