पुणे : पुण्यातील बाणेर येथील प्रसिद्ध ‘छोटू टपरीवाला’ कॅफेने चहा संस्कृतीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.सध्या चर्चेत असलेलं त्यांचं नवीन ‘Chai Thali™’ हे संकल्पना आज पुण्यातील चहा प्रेमींच्या मनात घर करतंय. थालीत मिळणारा चहा म्हणजे एका प्याल्यातलं प्रेम आणि आठवणी.
तसंच, चॉकलेटमध्ये बुडालेला ‘ओव्हरलोड बन’, स्वादिष्ट मिसळ, चहा खारी आणि पारंपरिक लोकरंगसंगतीने सजलेलं कॅफेचं वातावरण – हे सगळं पुणेकरांच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने करतंय.
‘छोटू टपरीवाला’ हे नाव आता केवळ एका टपरीपुरतं मर्यादित नाही, तर एक ब्रँड बनलंय. एक अशी जागा जिथे मित्र भेटतात, नवीन कल्पना जन्म घेतात, आणि चहा साक्षीदार असतो गप्पा-गोष्टींचा. पुण्यातील वाहतुकीची गर्दी, आणि वरदळी मुळे नागरिकांना आवश्यक असलेला निवांतपणाचा काही क्षण छोटू टपरीवाला मुळे अनुभवता येत आहे. या कॅफेमध्ये लहान मुलांसाठी घरगुती खेळांचे साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे लहान मुलांसह पालकांना एकत्रितपणे कॅफेचा आनंद घेता येणारे ठिकाण ‘छोटू टपरीवाला’ अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
या यशस्वी प्रवासामागे आहे एक सामान्य पुणेकराचा असामान्य दृष्टिकोन – स्वप्नील गंगवाल यांचा. त्यांच्या कल्पकतेने आणि मेहनतीने या टपरीला मिळाली आहे जागतिक दर्जाची ओळख. ट्रेडमार्क थालीपासून फ्रँचायझीच्या नव्या योजनांपर्यंत, छोटू टपरीवाला आता निवांतपणे बसून चहा बरोबर संवाद साधण्याची एक चळवळ झाली आहे.
तुम्ही जर पुण्यात असाल, आणि चहा प्रेमी असाल, तर ‘छोटू टपरीवाला’ एकदा तरी अनुभवायलाच हवा! आणि हो – मोबाईल नंबर लिहून ठेवा, ९५४५५९८९८९, कारण ही टपरी तुमच्या दिवसाची सुरुवात बदलू शकते! छोटू टपरीवाला मध्ये पुणे बुलेटिनच्या वाचकांना बिलात खास दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील स्वप्निल गंगवाल यांनी घेतला आहे.
घर ताज्या बातम्या ‘चाय थाली’च्या माध्यमातून बाणेर येथील ‘छोटू टपरीवाला’ ठरतोय पुण्यातील चहा संस्कृतीची ओळख...