पुणे : केंद्रातील मोदी सरकारची सर्वच् स्तरावर पोल-खोल होत असल्याने बदनामी पासुन वाचण्यासाठी विरोधी पक्ष नेते राहुल गांधींवर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी निर्बुद्धपणे तथ्यहीन व हास्यास्पद आरोप करत असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने स्वायत्त संस्थांचा राजकीय वापर करूनही २०२४ मध्ये ‘देशातील जनतेने’ काँग्रेसच्या १०० % जागा वाढवून, मजबूत ‘विरोधी पक्षनेते’ पद बहाल केले, तर भाजपच्या संसदेतील ३५% जागा कमी केल्या याचे उचित भान भाजपने ठेवावे.
मा. राहुलजी गांधी हे संविधानिक विरोधीपक्ष नेते पदी असुन, त्यांचे मेव्हणे रॅाबर्ट वाध्रा यांचेसाठी त्यांनी कशा प्रकारे (?) पदाचा गैरवापर केला हे स्पष्ट करावे, मोघम व तथ्यहीन बोलून अकलेचे तारे तोडू नयेत..! वास्तविक एप्रील २०२३ मध्ये भाजप’च्या हरीयाना सरकारला “रॅाबर्ट वाध्रा यांनी कोणत्याही नियमांचा व कायद्याचा भंग केला नाही” याचे ॲफीडेव्हीट दाखल करावे लागल्याने, त्यांचे विरोधातील केस मधील हवाच् निघून गेल्याने भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन ही बिघडले आहे.
देशाचे विरोधी पक्ष नेते मा राहुलजी गांधी देश व जनतेप्रती संविघानिक ऊत्तर दायित्व’ सक्षमपणे पार पाडत असून मोदी सरकार व निवडणुक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत असल्याने मोदी सरकारच्या पायखालची वाळू सरकली आहे.
११॥ वर्षात जंग जंग पछाडून ही दिवंगत पंतप्रधान स्व राजीव गांधी, सोनियाजी, राहुलजी व कुटुंबातील एक ही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत ही वास्तवता समोर आहे.
दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी हे ‘उच्चस्तरीय अधिकारी वर्गांचे समोर, बँक बुडवा, हिरे व्यापारी मेहुल चोकसीला भाई मेहुलजी म्हणून संबोधतात, घोटाळेबाज विजय मल्ल्या वा ललीत मोदी सरकार मधील उच्चपदस्थांना कल्पना देऊन पलायन करतात तेंव्हा कोण संविधानीक पदांचा दुरुपयोग करते (?) याचे आत्मपरीक्षण भाजपने स्वतः करण्याची गरज असल्याचा टोला ही गोपाळदादा तिवारी यांनी लगावला..!
स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत व संविधानीक लोकशाहीच्या रक्षणातील अमूल्य योगदान व सामान्य जनतेचा पाठिंबा नेहरू – गांधी कुटुंबीयाना अद्यापही मिळत असल्यामुळेच भाजप शिर्ष नेतृत्वास ते पचनी पडत नसल्याने टोकाची ईर्षा व असुयेमुळेच राहूल गांधींच्या बदनामीचा घाट घालण्याचे प्रयत्न वारंवार भाजप कडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.