बाणेर मुळा नदी घाट येथे छटपूजेचे डॉ. दिलीप मुरकुटे व उत्तर भारतीय आघाडीच्या वतीने आयोजन

पुणे : बाणेर मुळा नदी घाट येथे उत्तर भारतीय बांधवान सोबत छट महापर्व निमित्त सूर्य भगवानाला अर्घ्य अर्पण करत छटा पूजा करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. दिलीप मुरकुटे व प्रभाग क्रमांक 9, सुस बाणेर बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, महाळुंगे, सुतारवाडी मधील उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील 17 वर्षापासून सातत्याने छटपूजेचे आयोजन करण्यात येत आहे.

डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने घाटावरती छटपूजेसाठी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नाश्ता व पाणी व्यवस्था उत्तर भारतीय नागरिकांसाठी करण्यात आली होती.

यावेळी डॉ. दिलीप मुरकुटे, उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वर्मा, राजेश वर्मा, प्रवीण कुमार सिंह, विद्यासागर सिंह, हरिश्चंद्र वर्मा, नजमा आलम, रणजीत राम, चंदन कुमार चौरसिया, सोनू राय, नंदनलाल राय दुर्गेश मुखिया, रमेश कुमार कनोजिया, जयकिशोर साह, जितेंद्र प्रजापती, सुभाष सहानी, काशिनाथ वर्मा, सुमित यादव, राम गायकवाड, एडवोकेट विशाल पवार, सोमनाथ कोळेकर, रखमाजी पाडाळे, जयेश मुरकुटे, मेहबूब शेख, सलीम सुतार, नितीन चांदेरे, ज्योती चांदेरे, एडवोकेट सुदाम मुरकुटे, शिवाजी चिव्हे आदी उपस्थित होते.

यावेळी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे आदी परिसरातील उत्तर भारतीय नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

See also  म्हातोबा नगर कोथरूड मधील राडारोड्याच्या वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त