पाषाण : पाषाण बाणेर बालेवाडी परिसरात लोकसंख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे जुन्या चाळीची घरे जाऊन इमारती बांधल्या गेल्या आहेत. आय.टी. चे जाळे मोठया प्रमाणावर पसरले आहे त्यातुलनेत या परिसरातील नागरिकांना सुविधा फार कमी प्रमाणात मिळत आहे असा दावा माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी केला.
गेल्या 10 ते 25 वर्षात या परिसरात मोठया प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे पण त्यांना लाईट, पाणी ड्रेनेज व्यवस्था आदी नागरी सुविधा पूर्वील्या गेल्या नाहीत.या परिसरात हिंजेवाडी ते सिविल कोर्ट पर्यंत मेट्रोचे काम अतिशय संथगतीने चालले आहे त्यामुळे या परिसरात बाणेर बालेवाडी परिसरात वाहतुकीची कोंडी मोठया प्रमाणावर होतं आहे. नागरिकांना व वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास होतं आहे. प्रदूषणही भरपूर वाढले आहे. त्याचाही परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतं आहे.
मेट्रोचे काम पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे ते जरी पूर्ण झालं तरी या परिसरातील नागरिकांच्या समस्या संपणार का हा प्रश्न या भागातील नागरिकांना सतावते आहे.मेट्रोच्या कामामुळे या परिसरातील पर्यावरणावरही परिणाम झाला आहे मेट्रोमुळे रस्ते अरुंद झाले आमच्या समस्या संपणार केव्हा हा खरा प्रश्न आहे. काहीजण आम्ही हे प्रश्न सोडवू समस्या दूर करू असे सांगतात पण ते केव्हा होणार याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.