हडपसर : अतिरिक्त महापालिका महापालिका आयुक्त (विशेष) यांनी मुंढवा ताडीगुत्ता चौक ते हडपसर रेल्वे स्टेशन तसेच हडपसर रेल्वे स्टेशनच्या उत्तर व दक्षिण बाजूकडील अस्तित्वातील व नियोजीत रस्त्यांची जागा पाहणी केली.
रस्तारूंदी क्षेत्रातील मिळकतधारकांची बांधकामे तसेच रस्त्याच्या आखणी बाधित क्षेत्रामध्ये रेल्वे टर्मीनलची चालू असलेली बांधकामे यांची पाहणी केली तसेच रस्तारूंदी बाधित क्षेत्राचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने भू संपादन करणे व रस्तारूंदीत अडथळा ठरणारी बांधकामे नोटीसा देवून व संयुक्तिक कारवाईचे नियोजन करून काढण्याचे आदेश दिले.
हडपसर रेल्वे स्टेशनच्या दक्षिण बाजूकडील पी.पी.पी. अंतर्गत चालू असलेल्या कामांची पाहणी करून कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सदर पाहणीचे वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता ( पथ ) श्री. अनिरूध्द पावसकर , अप्पर रेल प्रबंधक श्री. पद्मसिंह जाधव , रेल्वेचे CPM / GSV श्री. संजय लव्हात्रे उपस्थित होते.