सुसगाव येथे सुस-महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशनच्या कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे यांचा नागरिकांशी संवाद

सुसगाव : भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी सुस महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशन तर्फे आयोजित आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमात उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुसगावचे माजी उपसरपंच सुहास भोते, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, प्रसाद खाणेकर, दिनेश ससार, महेश पाडाळे अदि उपस्थित होते.


असोसिएशन मधील सर्व सोसायटी वर्गाने सोसायट्यांना सोलर पॅनल बसून देण्यासाठी आमदार फंड उपलब्ध करून देण्याबाबत तसेच विविध मागण्या संदर्भात निवेदन सुस महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशन चे अध्यक्ष सुदीप पाडाळे यांनी वाचून दाखवले.

आमदार संग्राम थोपटे म्हणाले, पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए आयुक्त यांची भेट घेऊन सोसायटी मधील अमेनिटी स्पेस मध्ये विभागातील रहिवाशांसाठी उद्याने करता येतील यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भामध्ये सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.

सदर कार्यक्रमा मध्ये सुस महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशनचे संस्थापक कै. प्रदीप (दादा) पाडाळे यांच्या स्मरणार्थ पाडाळे परिवारातर्फे आमदार संग्राम थोपटे यांना श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे अध्यक्ष सुदीप पाडाळे यांनी केले आणि प्रस्तावीक श्री. रमेश धनगर यांनी केले आभार असोसिएशनचे सदस्य श्री राजेंद्र नेवे यांनी केले.

See also  पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख