पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक यांना जयंती दिनी अभिवादन

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे कामगार नेते सुनिल शिंदे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुनिल शिंदे म्हणाले की, ‘‘लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील  एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वतंत्रता व स्वायत्ततेसाठी लढा दिला. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते.’’ 

यावेळी कामगार नेते सुनिल शिंदे यांच्या समवेत राज अंबिके, मनोहर गाडेकर, देवीदास लोणकर, सचिन भोसले, प्रियंका मधाळे, विजय हिंगे, आशिष वाघमारे, ए. वाय. मायकल, गुरूनाथ बिराजदार, दिलीप लोळगे, प्रविण चव्‍हाण, नरेश अवटी, पोपट पाटोळे आदी उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथे नवचैतन्य हास्ययोग परिवारने केला योगदिन साजरा