पुणे : कॉर्पोरेट जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत प्युअर (People for Urban and Rural Education) या संस्थेने डेटा इकॉनॉमीच्या सहकार्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष सीएसआर उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत येरवडा येथील घर – संत ईश्वर फाउंडेशन मधील वंचित व अनाथ मुलांसोबत सण साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्युअर व डेटा इकॉनॉमीच्या टीमने मुलांशी आत्मीय संवाद साधत त्यांना नवीन शूज व कपडे भेट दिले. या उपक्रमामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला. या कार्यक्रमाला प्युअरच्या CEO डॉ. शैला तल्लुरी व व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती संध्या उपस्थित होत्या. त्यांनी नमूद केले की, कॉर्पोरेट आणि गैर-सरकारी संस्थांतील भागीदारीमुळे समाजात खऱ्या अर्थाने सकारात्मक व अर्थपूर्ण बदल घडवता येतो.