बोपोडी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शहर उपाध्यक्ष विजय जाधव,शहर सरचिटणीस अमित जावीर यांनी आयोजित कार्यक्रमात बोपोडी येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ पुरस्कार देण्यात आले. बोपोडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिवशाहीर श्रीकांत वसुधा अनिल शिर्के यांचा तसेच समाजातील चळवळी चे विकास कंबळे,अनिल रस्ते नवनाथ वाघमारे,ह.भ.प. गणेश चोरगे,ह.भ. प. कीर्तनकार प्रताप बहिरट, बौद्धचार्य विनोद यादव,मयुरी आगळे,अनुपमा कदम,मनोरमा खंडागळे ,संतोष शकत,जे.डी. सारवान , आदी मान्यवरांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप दादा देशमुख तसेच खडकी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेब यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सन्मान देण्यात आला.
यावेळी मतदारसंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर,प्रदीप चोपडे, आनंद चव्हाण,धनंजय जवलेकर, रवी पिल्ले, शिंदे, स्वामी,महिला अध्यक्ष नूतन ताई गायकवाड, शारदा सोडी, मनोरमा ताई,आगळे ताई आणि पदाधिकारी उपस्थित होते.