कोथरूड : कोथरूड कचरा डेपो परिसरातील विविध समस्या संदर्भात काँग्रेस अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष कोथरूड विभाग किरण अडागळे यांनी सहायक आयुक्त केदार वझे यांची भेट घेऊन कोथरूड कचरा डेपो मधील विविध ठिकाणी होणाऱ्या कचऱ्या संबंधित चर्चा करून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले.
कोथरूड कचरा डेपो मध्ये सुमारे 70 ते 80 टन कचरा पडून असल्याने या परिसरामध्ये दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच कचरा डेपोच्या गाड्यांच्या मुळे या ठिकाणी रस्ता खराब होऊन गाड्या घसरत आहेत.
आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच रोडवर ओल्या कचऱ्यामुळे गाड्या स्लिप होतात, पार्किंग चे नियोजन बरोबर नाही. या संदर्भामध्ये तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन तातडीने कारवाई करण्याचा आदेश यावेळी सहाय्यक आयुक्त केदार वजे यांनी दिले. या प्रश्नांबद्दल कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.