भाजपा खासदार गिरीश बापट यांचे वयाच्या 74 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन

पुणे : पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री खा. गिरीष बापट यांचे वय ७४ यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला.
नगरसेवक ते आमदार, खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मजबुतीचे व ताकदवान संघटन उभे करणारे नेतृत्व असे व्यक्तिमत्व म्हणून बापट यांची ओळख होती .

पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत खासदार गिरीश बापट यांनी भाजपाच्या उमेदवारासाठी मेळावा घेत प्रचारात सहभाग घेतला होता तसेच व्हीलचेअर वरून मतदान देखील केले होते.

कसबा विधासनसभा मतदारसंघातून बापट १९९५ पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. २०१७ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात सुमारे ५ लाखांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. महापालिकेतही नगरसेवक म्हणून ते तीन वेळा निवडून आले होते.

See also  पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या पाणीपट्टी वसुलीवर महापालिका लवकरच काढणार तोडगा