खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधींसह ३०० खासदारांच्या अटकेचा व वोट चोरीचा निषेध व्यक्त करण्यात आला

पुणे :काँग्रेस पक्षाचे नेते मा. राहुल गांधी यांच्यासह ३०० खासदारांना अटक करण्यात आल्याच्या तसेच निवडणूक आयोगाने कथितरित्या वोट चोरी केल्याच्या निषेधार्थ खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्ररंगनाना चव्हाण पाटील यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सदस्य श्रीकृष्ण बराटे, हवेली तालुका अध्यक्ष सचिन बराटे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा अवधूत मते, पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण उपाध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस जिल्हा काँग्रेस अर्चनाताई शहा,आप्पा खुडे, अतुल कारले, विजय लगड, मिलिंद पोकळे, सुरेश मते, विशाल पवार, शंकरराव दांगट, विश्वजित जाधव यांसह इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.

आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत सरकार व निवडणूक आयोगाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

See also  डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर परिसंवादात चर्चा