पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत. निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतांची चोरी करून गैर मार्गाने भाजपाने सत्ता मिळवली आहे. याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ना. गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौक ते ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेजचा मुख्य दरवाजा पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला. निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या मशाल मोर्चाद्वारे आम्ही करीत आहोत.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, भीमराव पाटोळे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, मेहबुब नदाफ, राज अंबिके, प्राची दुधाणे, राजेंद्र भुतडा, प्रदीप परदेशी, नितीन परतानी, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, राजेंद्र मोहिते, द. स. पोळेकर, इम्रान शेख, रवि ननावरे, अनिता धिमधिमे, अर्चना शहा, शारदा वीर, स्वाती शिंदे, उषा राजगुरू, कांचन बालनायक, माया डुरे, ब्लॉक अध्यक्ष रविंद्र माझीरे, अजित जाधव, रमेश सोनकांबळे, दिलप तुपे, दिपक ओव्हाळ, विनोद रणपिसे, गुलाम हुसेन खान रवि आरडे, विकार शेख, हर्षद हांडे, सुरेश चौधरी, मुन्ना खंडेलवाल, चेतन पडवळ, आदी उपस्थित होते.