बाणेर : सकल मराठा समाजाच्या वतीने औंध पाषाण बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी बावधन परिसरातील मराठा समाजाच्या वतीने रविवारी 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता कुंदन गार्डन बाणेर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड मराठा समाजाच्या वतीने संघर्षयोद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलन व उपोषण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या चावडी बैठकांचे आयोजन गावोगावी होत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने औंध बाणेर बालेवाडी सूस महाळुंगे सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी बावधन परिसरातील मराठा समाजाची एकत्रित बैठक कुंदन गार्डन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मराठा समाजातील युवक, महिला तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरातील सकल मराठा समाजाच्या मागण्या तसेच अडचणी संदर्भातील संवाद व कुणबी दाखले काढण्यात येत असलेले अडथळे तसेच 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलनाला जाण्याच्या नियोजनाबाबत सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.