बाणेर येथील सोपानराव कटके विद्यालयामध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न

बाणेर : शाडू माती पासून पर्यावरण पूरक श्रीगणेश मुर्ती साकार करण्याची कार्यशाळा स्व.सोपानराव कटके विद्यालय बाणेर येथे संपन्न झाली. त्यात इयत्ता ५ वी ते ८ वीचे सुमारे ४२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुप्रसिध्द मूर्तीकार तथासेवानिवृत आदर्श मुख्याद्यापक श्रीकांत कुंभार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षक श्री.कुंभार यांचे शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे संकल्पक गीरीधर राठी, प्रकाश बोकील, डॉ.श्याम कुलकर्णी, उल्हास चित्रे, राजीव साने, अशोकराव अधिकारी, रामधनी,  प्रशालेच्या मुख्याद्यिपीका सौ.संगिता बंड , तोटे मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

See also  येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन