कचरा वाहक व वेचक यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपायुक्तांना निवेदन

पुणे : पुणे शहरातील कचरा वेचक आणि वाहून होणारे टेम्पो धारक यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्यांच्या बाबत पुणे महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपयुक्त संदीप कदम यांची भेट घेऊन विजय बापू डाकले यांनी निवेदन दिले.

 यावेळेस आरपीआयचे बाळासाहेब खांकाळ , लहुजी साम्राज्य संघटनेचे विजयराव बगाडे,  कचरा वाहक वेचक संघटनेचे अध्यक्ष नामदेव पुलवळे आधी प्रमुख उपस्थित होते.येत्या आठ दिवसात जर कचरा वाहक वेचकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर कचरा भरलेल्या टेम्पोसह पालिकेला घेराव घालण्याचा इशारा या वेळेस देण्यात आलेला आहे.

See also  बालेवाडीत "जन आशीर्वाद मेळाव्यात"  हजारोंच्या गर्दीसमोर सर्वसामान्यातील पाहुणे; चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बालवडकर यांची नाराजी