” पुणे जिल्हा महिला काॅंग्रेसची आढावा बैठक कॉंग्रेस भवन येथे संपन्न”


पुणे : अखिल भारतीय महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती नेटा डिसूझा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे यांच्या आदेशानुसार आणि डॉ. रेखा चव्हाण ( प्रभारी -पुणे व पिंपरी चिंचवड महिला काॅंग्रेस) यांच्या अध्यक्षतेखाली महिला काॅंग्रेसची संघटनात्मक बांधणी या विषयावर पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा किरणताई काळभोर यांनी कॉंग्रेस भवन येथे महिला काॅंग्रेसची आढावा बैठक आयोजित केली.या आढावा बैठकीच्या अंतर्गत तालुका, वॉर्ड,बूथ यामध्ये महिलांचा सहभाग कसा वाढावा, राज्याकडून येणारे उपक्रम कोणत्या पद्धतीने राबवावा, केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात घेतलेले निर्णय व होणाऱ्या घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली व्हावे “गाव तेथे शाखा, वॉर्ड तेथे शाखा ” याप्रमाणे काम करावे.सामाजीक उपक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ‌पद्धतशीरपणे करावे.याप्रसंगी कॉंग्रेसचे मुखपत्र ” शिदोरी ” याविषयी सर्वांना माहिती देण्यात आली.

यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे तसेच माजी महापौर कमल व्यवहारे (माजी अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस) , श्रीमती संगिता तिवारी (उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटी) या सर्वांनी डॉ.रेखा चव्हाण (प्रभारी – पुणे, पिंपरी -चिंचवड महिला काॅंग्रेस) यांचे स्वागत करून सत्कार केला.
मा.डॉ.रेखा चव्हाण ( प्रभारी पुणे, पिंपरी -चिंचवड महिला काॅंग्रेस) आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा किरण काळभोर यांच्या हस्ते ऍड.जया मोरे यांना पुणे जिल्हा काँग्रेस लिगल सेलच्या अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच श्रीमती गीता मांडेकर यांनाही खेड तालुका महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.या आढावा बैठकीसाठी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा किरणताई काळभोर यांनी केली तर आभार ऍड.जया मोरे यांनी मानले.

See also  उत्तम प्रशासन मानवाधिकाराचे कवच-डॉ.ज्ञानेश्वर मुळे