बाणेर : बाणेर बालेवाडी पाषाण औंध सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी परिसरातील मराठा समाजातील नागरिक संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईला जाण्यासाठी बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुंबईकडे रवाना झाले. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता एकत्रितपणे औंध बाणेर बालेवाडी पाषाण महाळुंगे सुस सुतारवाडी परिसरातील नागरिक मुंबईकडे पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत.
संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना वडगाव मावळ येथे औंध सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी पाषाण बाणेर बालेवाडी मराठा बांधवांच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात येणार असून काही गाड्या जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईकडे रवाना होणार आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार असून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाणेर बालेवाडी पाषाण औंध सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी भागातील मराठा बांधव देखील 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने सकाळी जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बाणेर येथे सकाळी साडेनऊ वाजता सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मुंबईकडे चार चाकी गाड्या एकत्रितपणे जाण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.