महाळुंगे : महाळुंगे येथील बेलएअर सोसायटीमध्ये यंदाचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात सुरू आहे. सोसायटीतील सर्व रहिवासी व कार्यकर्ते मनोभावे सहभाग घेत असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, भक्तिसंगीत आणि विविध उपक्रम यामुळे उत्सवाचे स्वरूप अधिकच मंगलमय झाले आहे. विशेष म्हणजे सोसायटीमध्ये प्रतिष्ठापित केलेली गणरायांची मूर्ती अत्यंत सुंदर व आकर्षक असून ती पाहण्यासाठी सर्वत्रून नागरिक भेट देत आहेत.
संपूर्ण सोसायटीत भक्ती, आनंद आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले असून गणेशोत्सवाचे हे सोहळे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
























