नृसिंह हायस्कूल माजी विद्यार्थी सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

सांगवी : सांगवी येथील नृसिंह हायस्कूल माजी विद्यार्थी सोशल फाउंडेशन च्या वतीने रविवारी 7 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी माजी विद्यार्थी मेळाव्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. यावेळी नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शितोळे नगर सांगवी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या रक्तदान शिबिरासाठी विशेष सहकार्य करण्यात आले आहे.

See also  स्त्रियांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचा आदर्श घ्यावा - उमेश चव्हाण