पुणे : पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ड्रोन शो चे आयोजन केले आहे यावर आम आदमी पार्टी पुणे शहराच्या वतीने ‘काय आहे पुणेकरांच्या मनात?’ असा सवाल उपस्थित करत पुणे शहरातील समस्यांवरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून टिका करण्यात आली आहे.
भाजपा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या ड्रोन शोच्या वरून आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी टीका केली आहे. पुणे शहरातील समस्या ड्रोन च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना दिसतील का असा प्रश्न विचारण्यात आला आहे. भाजपाचे नेते चमकोगिरी मध्ये व्यस्त आहेत त्यांना पुणे शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, शाळांच्या समस्या, वाढती गुन्हेगारी या पुणेकरांच्या खऱ्या समस्या दिसत नाहीत.
पुणे शहरात परतीच्या पावसामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले. शहरातील नागरिक त्रस्त असताना भाजपाचे नेते मात्र ड्रोन शोच्या माध्यमातून चमकोगिरी करत आहेत. शहराला एका जबाबदार नेत्याचे गरज प्रकर्षाने जाणवत असल्याची टीका आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केले आहे.