लायन्स क्लब इंटरनॅशनल 3234-D2 भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

कात्रज : लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, माय माऊली केअर सेंटर पुणे, शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल रास्ता पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी, मोफत बी पी, शुगर तपासणी, मोफत मोतीबिंदू तपासणी, डेंटल तपासणी मशीनद्वारे कॅल्शियमची तपासणी जनरल चेकअप व मोफत औषधे वाटप मोफत बॉडी पल्स थेरपी असे भव्य आरोग शिबिर नंदू भुवन वेताळ नगर कोंढवा पुणे येथे उत्साहात पार पडले.

सर्व जैन बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 248 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी 22 नागरिकांची नोंद झाली. 166 जणांनी बीपी व शुगर तपासणीचा लाभ घेतला 140 नागरिकांनी डेंटल तपासणीचा लाभ घेतला 138 नागरिकांनी मशीन द्वारे कॅल्शियम तपासणीचा लाभ घेतला व मोफत कॅल्शियमची औषधे देण्यात आली नागरिकांनी जनरल चेकअप करून मोफत औषधांचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाला उपस्थित जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित माय माऊली केअर सेंटर व क्लब ऑफ पुणे कात्रज चे संस्थापक व डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन, केट्रॅक्ट ला.विठ्ठलराव वरुडे पाटील, ला.हेमलता जैन, ला.विशाल वरुडे पाटील सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

See also  उमरजी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये गर्भ उपचार कार्यशाळा 2024 यशस्वीपणे संपन्न