औंध येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

औंध : स्वच्छता ही सेवा 2025 स्वच्छता अभियानांतर्गत औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडील निलकंठेश्वर मंदिर  गणपती विसर्जन घाट नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 

यावेळी माजी सभासद सनी निम्हण,श्री वसंत जुनवणे औंध गाव विश्वस्त समिती पदाधिकारी, श्री गणेश कलापुरे, सचिन वाडेकर, सौरभ कुंडलिक,सागर परदेशी तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग घेऊन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री विजय भोईर यांच्या नियंत्रणा मध्ये जनजागृती व स्वच्छता  अभियान राबविण्यात आले.

या अभियानामध्ये आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, मोकदम रोहित शेंडगे, अंगणवाडी सेविका लताताई धायगुडे तसेच सर्व सफाईसेवक यांचा समावेश होता. या अभियान अंतर्गत सुका कचरा पाला पाचोळा गार्डन कटींग वेस्ट उचलण्यात आले.

See also  पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षांची बैठक संपन्न