मुळशी तालुक्यात रविवारी कृषी साहित्य संमेलन. शेतकरी संघाच्यावतीने आयोजन

मुळशी : मुळशी तालुका शेतकरी संघ व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक यांच्यावतीने रविवारी कृषी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शेतकरींना सेंद्रिय व आधुनिक शेती, फळबाग लागवड, शासनाच्या योजनांची माहिती यावेळी मिळणार आहे. संमेलनाचे उध्दघाटन खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते होणार आहे.

समारोप कृषी परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते यांच्या हस्ते होईल. घोटावडेफाटा येथील सुंदबन कार्यालयात साहित्य संमेलन होणार आहे. सकाळी नऊ वाजता शेतकरींची कृषी व ग्रंथ दिंडी निघणार आहे. यामध्ये बैलगाड्या, ट्रॅक्टर, पालखी, महिलांचा सहभाग राहणार आहे. संमेलनाच्या ठिकाणी शासनाच्यावतीने जनावरांसाठी मोफत चारा बियाणे वाटप करण्यात येणार आहे. तसेच आधुनिक यंत्र सामुग्री, सेंद्रिय खते, बियाणे, ठिबक सिंचन, मोटर स्टार्टर, केशर आंबा लागवड माहिती, महाडिबीटीवरून यंत्र सामुग्री मिळविण्याची माहिती यांचे स्टॉल राहणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष केंद्रीय अन्न पुरवठा महामंडळाचे माजी सदस्य शांताराम जांभूळकर व स्वागत अध्यक्ष तात्यासाहेब देवकर यांची निवड करण्यात आली आहे. बेलावडे येथील कातकरी आदिवासींचे नृत्य राहणार आहे. यावेळी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे अनुभव शेतकरींना ऐकण्यास मिळणार आहे. शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मारणे यांच्या आंदगाव ते अमेरिका व उपाध्यक्ष भाऊ केदारी यांच्या शेत दलाल काव्य संग्रामाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

संमेलन आयोजनासाठी पुणे जिल्हा बॅंकेचे उपअध्यक्ष सुनिल चांदेरे, शेतकरी संघाचे सहखजिनदार राम गायकवाड, कार्याअध्यक्ष भाऊ आखाडे, सहसचिव लक्ष्मण निकटे, खजिनदार अनंत ढमाले, उपअध्यक्ष माणिकराव शिंदे, सचिव साहेबराव भेगडे, सदस्य अंकुश येणपूरे, रा. सु. शेलार, संतोष साठे, तुकाराम मरे, दत्तात्रय मारणे, सुरेश मालपोटे, घनशाम ववले, निलेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

See also  अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आरपीआयचे नेते संतोष गायकवाड यांची मागणी