कोथरुडकरांठी मोफत महा ईसेवा केंद्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

कोथरुड : कोथरूड मधील नागरिकांना आपले विविध प्रकारचे शासकीय दाखले मिळणे आता आणखी सोपे आणि सहज होणार आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला असून, आपल्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात मोफत ईसेवा केंद्र सुरू केले आहे. नामदार पाटील यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक दुर्बलांना मोठा आधार मिळाला आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा दक्षिण कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या उपस्थितीत ही सेवा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका तथा कोथरुड मंडल महिला मोर्चा प्रभारी मंजुश्री खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस प्रा. अनुराधा एडके, गिरीश खत्री, दीपक पवार, उपाध्यक्ष हेमंत बोरकर , दिनेश माझिरे , शंतनू खिलारे, प्रदीप ज़ोरी, प्रभाग १३ अध्यक्ष ॲड. प्राची बगाटे, प्रभाग ११ चे अध्यक्ष अशुतोष वैशंपायन, युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, युवा मोर्चा सरचिटनीस कुणाल तोंडे, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर, महिला मोर्चा सरचिटनिस सौ केतकीताई कुलकर्णी, चिटणीस अभिजीत गाड़े, सौ निर्मला राइरिकर, जनार्दन क्षिरसागर, कैलास मोहोळ, विजय राठोड, स्वीकृत नगरसेवक बापु मेंगड़े, अद्वैत जोशी, राजेश राठौड़, राहुल देशपांडे, सौ. पूनम कारख़ानिस यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजने अंतर्गत, महाराष्ट्रात महा ई-सेवाकेंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या सामान्य सेवा केंद्र योजना (सीएससी) स्थापन करण्यात आल्या आहेत. यालाच महा-ईसेवा केंद्र असेही म्हटले जाते. या केंद्रामधून राज्यातील नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, डेमेसाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला, नॉन क्रीमिलेअर यांसह विविध प्रकारचे दाखले आपल्या आवश्यकतेनुसार तात्काळ उपलब्ध होत असतात. यामुळे नागरिकांचा वेळही वाचतो. त्यासोबतच सरकार कार्यालयात मारावे लागणारे खेटे ही वाचतात.‌

नागरिकांना आपले विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार शुल्क आकारुन सदर दाखले उपलब्ध करून दिले जातात. मात्र, अनेकांना हे दाखले मिळवताना मोठी काटकसर करावी लागते. आपल्याला उदरनिर्वाहासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून काटकसर करुन पैसे जमा करावे लागतात. त्यानंतरच ईसेवा केंद्रात जाऊन दाखले मिळवावे लागतात.

त्यामुळे कोथरुडकरांची ही अडचण दूर करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत महा ईसेवा केंद्र सुरू केले असून, या उपक्रमाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना मोठा आधार मिळाला आहे.

See also  भाजपा ओबीसी सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी राजेंद्र पाषाणकर यांची नियुक्ती