मराठवाड्यातील मतदारांची पुनर्बांधणीसाठी सुभाष भोळ यांची प्रभाग 9 बाणेर बालेवाडी सानेवाडीच्या भाजपा अध्यक्षपदी फेरनियुक्ती

बाणेर : भाजपा प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी सानेवाडी प्रभाग अध्यक्षपदी सुभाष भोळ यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये सुभाष भोळ यांनी यापूर्वी देखील बाणेर बालेवाडी पाषाण प्रभागाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाणेर बालेवाडी येथील कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील व खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला बाणेर बालेवाडी मधून सर्वाधिक मताधिक्य देण्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. मूळचे मराठवाड्यातील असल्याने परिसरातील मराठवाड्यातील लोकांचा दांडगा संपर्क ही त्यांची उजवी बाजू राहिली असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये सुभाष भोळ यांचा चेहरा महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

See also  हिंजवडी आयटी पार्क, माण, मारुंजी परिसरातील समस्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी