पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी):महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल सहा हजार फाईल्समध्ये बनावट कागदपत्रे सादर करून २९ कोटी रुपयांचे बिल दाखल करण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात बिल अदा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त बाहेर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधत आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी आयुक्तांकडे ईमेलद्वारे निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, “महानगरपालिकेच्या निधीचा गैरवापर होणे म्हणजे नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणे होय. ठेकेदारांना २९ कोटी रुपयांचे बिल अदा करणे ही जनतेच्या पैशांची थट्टा आहे. आम्ही तातडीने चौकशीची मागणी करत असून, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देतो.”
या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधत आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी आयुक्तांकडे ईमेलद्वारे निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, “महानगरपालिकेच्या निधीचा गैरवापर होणे म्हणजे नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणे होय. ठेकेदारांना २९ कोटी रुपयांचे बिल अदा करणे ही जनतेच्या पैशांची थट्टा आहे. आम्ही तातडीने चौकशीची मागणी करत असून, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देतो.”
रविराज काळे यांनी प्रशासनासमोर तीन ठोस मागण्या मांडल्या आहेत – या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमावी.चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराला कोणतेही बिल अदा करू नये.चौकशीचा संपूर्ण अहवाल जनतेसमोर पारदर्शकपणे प्रसिद्ध करावा.
काळे यांनी पुढे म्हटले की, “महानगरपालिकेतील आर्थिक पारदर्शकता ढासळू देणार नाही. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय हा विश्वासघात असून, आम आदमी पार्टी त्याविरोधात ठाम भूमिका घेईल.”