“पक्षी दूर देशी गेलं” कार्यक्रमाद्वारे पद्मश्री ना.धो.महानोरांना आदरांजली

मुंबई : मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी व गीतकार, पद्मश्री ना.धों.महानोर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी ‘पक्षी दूर देशी गेलं’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थित होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा आर्ट, कल्चर व फिल्म फाऊंडेशन, अभ्युदय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या कविता व गीतांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध कवी दासू वैद्य, प्रकाश होळकर (लासलगाव), संजीवनी तडेगावकर (जालना) व शिव कदम यांनी कवितांचे वाचन केले तर प्रसिद्ध गायक राहुल खरे व मालविका दीक्षित (पुणे) यांनी महानोर यांच्या रचलेल्या गीतांचे गायन केले. कार्यक्रमाचे निवेदन समाधान इंगळे यांनी केले.

याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कौतिकराव ठाले-पाटील, बाबा भांड, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार, नीलेश राऊत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  धर्मांधता दूर होण्यासाठी संविधान संस्कृतीचा उद्घोष आवश्यक : डॉ. श्रीपाल सबनीस