श्री भगवती सेवा आश्रम बाणेर येथे खोखो मैदान व पोल चे पूजन

बाणेर :श्री भगवती सेवा आश्रम बाणेर (पुणे) जीवन कौशल्य विभाग च्या वतीने मैदानी कौशल्य वृध्दी कार्यक्रम अंतर्गत क्रीडांगण पूजन तथा योजना प्रारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रमुख पाहुणे डॉ. शाम दलाल, प्रमुख विश्वस्थ, भगवती सेवा आश्रम यांचे हस्ते खोखो मैदान व पोल चे पूजन झाले. डॉ. दलाल यांनी या सर्व उपक्रमास शुभेच्छा व पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

गणेश भुजबळ यांनी उपक्रमातील भावी योजनांची माहिती दिली. सांघिक व वैयक्तिक खेळ कौशल्या बरोबरच व्होकेशनल ट्रेनिंग देऊन रोजगार निर्मिती क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, उद्योग निर्माण क्षेत्रात आवश्यक प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान दान इत्यादी विविध उद्दिष्टांची माहिती दिली.

यावेळी मनोज धरप, शशिकांत बालवडकर, गिरीशजी कांदळगावकर, भालचंद्र सरडे, रुपेश पागे व सौ. सुनिला पागे, दत्ताजी चंदन, गिरीधरजी राठी, अरुण पवार, मिलिंद क्षिरसागर आदि मान्यवर तसेच परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्रतिष्ठित नागरीक यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

श्रीकान्त चिटणीस यांनी विश्वकल्याण प्रार्थना म्हणून कार्यक्रमास सुरवात केली. श्री. राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

See also  देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान -राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू