नागपूर : मोहपा, जिल्हा नागपूर येथे सत्यशोधक समाज स्थापनेचा १५२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
म. फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून भेदाभेद टाकणारा, सर्वांना समान संधी देणारा, समतेवर आधारित “सार्वजनिक सत्यधर्म” जगाला दिला. २४ सप्टेंबर लाच १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्यभिषेक शाक्त पद्धतीने केला होता.
” मा . फुले यांचे सत्यशोधक तर्कवादी असावे “समाजात मानवी जिवन जगत असतांना कुठलीही घटना घडत असता आपण तर्कवादी बनून त्यावर प्रश्नच विचारत नाही म्हणून आपला भारतीय बहुजन समाज दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे,असे प्रतिपादन दीपक श्रोते यांनी सत्यशोधक समाज स्थापना वर्धापन दिन निमित्ताने गजानन सभागृह मोहपा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केले.
समाजात चालू असलेल्या वाईट चालीरीती,परंपरा, अंधश्रद्धा, व्यसन, धार्मिक परंपरा, कर्मकांड कुठून आल्या याचा काहीही शोध न घेता, माझा आज्याआजी, बापानी केले म्हणून मी करतो, अरे दादा या सर्वांवर आता आपण प्रश्न विचारले पाहिजे तरच आपण म. फुले यांचे कार्य पुढे नेवून सत्यशोधक बनवून सर्व समाज प्रगतिशील, बुद्धी मान,धष्टपुष्ट म्हणजेच प्रबुद्ध भारत बनविण्यास वाटचाल करू, अन्यथा शैक्षणिक, सामाजिक , धार्मिक, व आर्थिक क्षेत्रात आपली काय अधोगती सुरू आहे यावर सत्यशोधक मंडळींनी विचार केला पाहिजे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रशांत राऊत यांनी विद्यार्थी हा समाजाचा कणा असल्याने त्यांनी शिक्षण घेत असताना त्यावर आपण आपल्या गुरू , आई -वडील व घरातील ईतर मोठ्या मंडळींना प्रश्न विचारले पाहिजे. आपण असे करीत नाही, त्यामुळे तुमची उपरोक्त क्षेत्रात अधोगती होत असल्याचे समजावून सांगत असताना मा. फुले यांच्या शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथातील
विद्येविना मती गेली !
मतिविना निती गेली!
नीतिविना गती गेली !
गतिविना वित्त गेले !
वित्तविना शूद्र खचले!
एवढे अनर्थ एका अवीद्देने केले!
हे मा. फुले यांचं ब्रीद समजावून सांगताना आजचा विद्यार्थी उद्याचा भारतीय नागरिक दिवसेंदिवस शैक्षणिक, सामाजिक , धार्मिक , आर्थिक व राजकिय क्षेत्रात मागे कसा पडत चालला हे समजावून सांगितले, तर डॉ विलास गजबे यांनी म. जोतिबा फुले यांचे कार्य ,गुलामगिरी, सत्यशोधक समाज व शेतकऱ्याचे आसूड ,त्यांचे प्राथमिक शिक्षणआदी लिखानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत कसे सामावून घेतले. हे सांगत असताना घटनेतील मूलभूत अधिकार, आरक्षण, स्त्रियांसाठी लिहलेले हिंदू कोड बिल आदी हे सर्व भारतीय संविधानात कसे सामावून घेतले हे पटवून दिले. त्यासाठी तुम्हास जोतीबांचे उपरोक्त ग्रंथ वाचल्या शिवाय समजणार नाही. जेजे जोतीबांनी केले तेते बाबासाहेबांनी संविधानात नमूद केले आहे त्यामुळे आपण थोडे प्रगतीपथावर आहोत ,पण आज वर्णवर्चस्व वादी , धर्म मार्तंड, जातीयवादी , राजकारणी लोक संविधानात कुरघोड्या करून कसे खोडू पाहात आहे,यावर आपण सजक असले पाहिजे अन्यथा हजारो वर्षापासून आपण ज्या गुलामगिरीत खितपत पडलो होतो ती पुन्हा येवून आपल्या मानगुटीवर बसल्या शिवाय राहणार नाही .यासाठी आपण सर्व भारतीय आपल्या या महामानव क्रांतीसुर्य ज्योतिबा फुलेंच्या कार्याला जिवंत ठेवण्यासाठी सत्यशोधक मंडळींनी त्यांच्या विचारांचा प्रच्यार केला पाहिजे. मुके बनून राहू नका. आपण मोहपा येथील सर्व सत्यशोधकी हे करीत आहात त्यासाठी धण्यवादास पात्र आहात कारण प्रबुद्ध भारताच्या निर्मितीस सत्यशोधक समाज हाच कारणीभूत ठरू शकतो कारण तो तर्कवादी असतो असे प्रतीपादन डॉ विलास गजबे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगर अध्यक्षा शोभाताई कौटकर , मा. फुले वाचनालयाचे अध्यक्ष त्र्यंबक राऊत, मा. फुले स्टडी सर्कल चे अध्यक्ष डॉ प्रशांत महाजन उपस्थित होते . कार्यक्रमाला आवर्जून मोहपा व परिसरातील सत्यशोधक मंडळीं ,विद्यार्थी , व सत्यशोधक समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्र संचालन सरिता आंजनकर यानी केले. प्रास्ताविक श्रीराम रंगारी तर पाहुण्यांची ओळख डॉ. प्रशांत महाजन यांनी करून दिली. कार्यक्रमाला विद्यार्थी व तरुण तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार कौटकर, सूर्यकांत डांगोरे, अरुणा डांगोरे, जयदेव बेलसरे आदींनी प्रयत्न केले.