महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. ३० : राज्यातील औद्योगिक व शैक्षणिक परिसंस्थेला ऑस्ट्रेलियन कौशल्यांशी जोडून परिवर्तनशील शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब (MAISH) उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्यविकासाला चालना मिळणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इनोव्हेशन अँड स्किल्स हब बाबत बैठक झाली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू , डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, सहसचिव संतोष खोरगडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब (MAISH) हा केवळ शैक्षणिक उपक्रम नाही, तर राज्याला एक शाश्वत ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचे ध्येय असलेला दूरदर्शी संकल्प आहे. हा हब ऑस्ट्रेलिया-इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्या बैठकीतून उदयास आलेल्या या उपक्रमातून युवकांना सबलीकरण, नवोन्मेष वृद्धी आणि द्विपक्षीय संबंध बळकटीकरणाची संयुक्त बांधिलकी होणार आहे.

मुंबई, पुणे व नागपूर ही राज्यातील शिक्षण व उद्योगांची केंद्रे असली तरी हवामान बदल, ऊर्जा मागणी आणि शाश्वत विकास या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन व त्याचे व्यावसायिक रूपांतरण गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्याचा नवा अध्याय या हबच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या उपक्रमामध्ये आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी.वाय. पाटील विद्यापीठ यांच्यासह राज्यातील अग्रगण्य संस्था, विद्यापीठ तसेच ऑस्ट्रेलियातील न्यूकॅसल, मोनॅश, आरएमआयटी व सिडनी विद्यापीठ सहभागी होणार आहेत. या माध्यमातून परदेशातील अभ्यासक्रम आणि विशेष कौशल्य प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थ्यांना  पीएचडी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी प्रशिक्षित करणे, ऊर्जा व आरोग्य क्षेत्रातील किमान  पेटंट तंत्रज्ञान विकसित करणे, तसेच आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचे आदानप्रदान साध्य करणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

See also  आयुक्तांकडे मागणी HMVP विषाणू पुण्यात शिरकाव करण्या अगोदर उपाययोजना करा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी