पुणे :ह.भ.प. कै. गेनबा म्हस्के मेमोरियल ट्रस्ट, कळस म्हस्के वस्ती, आळंदी रोड पुणे-१५ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सव २०२५ मध्ये यंदा कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी स्थायी स्वरूपात मंदिरामध्ये देवीची मूर्ती असून गेल्या २८ वर्षांपासून ट्रस्ट धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबवत आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारल्यानंतर परिसरातील तसेच शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. भव्य सजावट व अप्रतिम देखाव्यामुळे भाविकांच्या मनामध्ये नवरात्र उत्सवाचे धार्मिक वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
या देखाव्याच्या यशामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव रमेश म्हस्के यांच्यासह खजिनदार दर्शन डांगे, वैभव सकट, राज चौधरी, आईनुर खान, चेतन तिवनकर, रितिक थोरात, अक्षय वर्मा, तन्मय विचारे, सुरज बिराजदार, किरण साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.स्थानिक नागरिक व भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा नवरात्र उत्सव अधिकच भव्य व भक्तिमय वातावरणात पार पडत असल्याचे चित्र दिसून आले.
























