श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या धनकवडी केंद्रात २८६ जणांची मोफत रक्त तपासणी

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रूग्ण सेवा अभियानांतर्गत धनकवडी येथे मोफत रक्त तपासणी केंद्र चालू करण्यात आले, त्याचा लाभ २८६ जणांनी घेतला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण यांनी दिली.

या केंद्रात ब्लड ग्रुप, थायरॉईड प्रोफाइल, लिपिड प्रोफाइल आदी चौदा प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात येतात. रूग्णाने रक्त तपासणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन येणे आवश्यक असते. सामान्य माणसाला न परवडणाऱ्या रक्त तपासण्या येथे मोफत होत असल्याने रूग्णांसाठी हे केंद्र दिलासादायक ठरलेले आहे. धनकवडी परिसरातील रूग्णांच्या मागणीवरून काशीनाथ पाटील नगर येथे १ जानेवारी २०२४ला हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले. जानेवारीतच २८६ जणांनी पहिल्या महिन्यातच या सेवेचा लाभ घेतला. सुवर्णयुग तरुण मंडळ या केंद्राचे व्यवस्थापन पाहात आहे, असे माणिकदादा चव्हाण यांनी सांगितले.

See also  औंध बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातून मराठा बांधव अंतरवली सराटीकडे महाबैठकीसाठी रवाना