भारती विद्यापीठात ‘उडान’ उत्साहात!

पुणे: भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ‘उडान: स्टुडन्ट इंडक्शन कार्यक्रम’ नुकताच यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश नव्या विद्यार्थ्यांना संस्थेचा परिचय करून देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी प्रेरणा देणे असा होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. डॉ. सचिन चव्हाण, उपप्राचार्य, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवकल्पना आणि स्टार्टअप्सविषयी मार्गदर्शन करत उद्योजकतेच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा दिली. मा. प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख यांनी भारती विद्यापीठाच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला आणि अभियंते समाजाच्या जडणघडणीत कसे महत्त्वपूर्ण आहेत, हे स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयक प्रा. सुजाता पाटील यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा. अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुखांची ओळख करून दिली.

प्रसिद्ध अभिनेते व प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. राजेंद्र उत्तूरकर यांनी  “व्यक्तिमत्त्व विकासाचे” महत्त्व आपल्या प्रभावी भाषणातून विशद केले. मा. डॉ. आरती दिदी, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, पुणे यांनी “डिजिटल वेलनेस” या विषयावर संवाद साधत डिजिटल युगात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. मा. सुलभा दीदी यांनी ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक घेतले.

प्रा. अश्विनी गोखले यांनी “आउटकम-बेस्ड एज्युकेशन” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शुभम शिंदे यांनी “संवाद कौशल्यांचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. उपमन्यु बंगाले यांनी “एआय च्या युगातील करिअर संधी” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. चेतन पाटील यांनी “परीक्षांचे महत्त्व” तसेच श्री. संदेश  सोनताटे यांनी विविध शिष्यवृत्ती विषयक मार्गदर्शन केले.

प्रा. सुजाता पाटील यांनी “स्वयं आणि ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया” या विषयावर मार्गदर्शन करत ऑनलाइन शिक्षणातून मिळणाऱ्या संधींवर प्रकाश टाकला. प्रा. विद्या  खोबरे यांनी “विद्यार्थी विकासात एन.एस.एस. ची भूमिका” यावर संवाद साधला. प्रा. जागृती ठाकरे  यांनी “विद्यार्थ्यांसाठी कला आणि संस्कृतीचे महत्त्व” यावर भाष्य केले. डाॅ. प्रशांत शिंदे यांनी “क्रीडा आणि विद्यार्थी विकास” या विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ. वैशाली फाळके, प्रा. उदय पवार तसेच प्रा. तानाजी कणसे यांनी तंत्रनिकेतनमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.

See also  पतित पावन संघटनेच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डाॅ. प्रशांत शिंदे यांनी केले, सर्व  विद्यार्थी प्रतिनिधींनी अत्युत्तम कामगिरी बजावली. कु. प्रतीक सादीगले आणि कु. ज्ञानेश्वरी पार्टे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले, ज्यामुळे कार्यक्रमाची छाप कायम राहिली.