महाळुंगे येथे टीपी स्किम, रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन व महाळुंगे ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने आंदोलन

महाळुंगे : महाळुंगे हायटेक सिटी मधील टीपी स्कीम व रस्त्यांच्या दुरावस्थे संदर्भात जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन व महाळुंगे ग्रामस्थ तसेच सोसायटी परिसरातील नागरिकांनी आंदोलन करत पुणे महानगरपालिका व शासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी जयेश मुरकुटे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, अशोक मुरकुटे, शांताराम पाडाळे, माजी सरपंच नामदेव गोलांडे, माजी सरपंच मयूर भांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष संदीप बालवडकर, सोपानराव पाडाळे, लक्ष्मण पाडाळे बापूसाहेब पाडाळे, ज्योती चांदेरे, अंकुश पाडाळे, संजय मुरकुटे, नितीन पायगुडे रणजीत पाडाळे, सागर चिव्हे, तुषार हगवणे, रितेश पाडळे, रितेश निकाळजे, हर्षदा थिटे, प्रमिला मुरकुटे, प्रियंका सिंग, ज्योती सिंग, आशिष बापट, अमित कुटे, राहुल कदम, संदीप तनपुरे, शुभम सिंग, प्रशांत कुमार, हरिनारायण पटेल आदी उपस्थित होते.

कुल-एचोलोक,व्हीटीपी अल्पाइन ,व्हीटीपी लिओनारा, व्हीटीपी बेलाअर, गोदरेज हिलसाइड १, गोदरेज हिलसाइड २ , व्हीटीपी, एथेरियस, गोदरेज ग्रीनकोव्ह, रिवेरिया आदी सोसायटीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. आंदोलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच महाळुंगे गावात ग्रामस्थ व सोसायटीमधील नागरिक यांनी संयुक्तपणे आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

महाळुंगे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले आहे परंतु या परिसरामध्ये अद्यापही पीएमआरडीए, टाऊन प्लॅनिंग मार्फत विकास केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येथील डेव्हलपमेंट प्लॅन मधील रस्ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत तसेच शेतकऱ्यांना देखील योग्य मोबदला देण्यात आला नाही. गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पालिकेने डेव्हलपमेंट आराखडा तयार करावा व टाऊन प्लॅनिंग योजनेतून गाव वगळण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे महानगरपालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून महाळुंगे ते नांदेगाव हिंजवडी कडे जाणारा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलना दरम्यान करण्यात आली. यावेळी पी एम आर डी ए च्या अभियंता स्नेहा हब्बू यांना जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

See also  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जाजिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील