पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून दहा टन धान्याचा ट्रक पूर्वग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कडे सुपूर्त !

पुणे : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मदतीचा मोठा हात पुढे करण्यात आला आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि काही नागरिकांनी एकत्र येऊन जवळपास १० टन विविध प्रकारचे जीवनावश्यक धान्य आणि इतर वस्तू जमा केल्या आहेत. ही मदत सोलापूर काँग्रेस कमिटीकडे सुपर्द करण्यात आली. या मदतीचा साठा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सोपविण्यात आले.

See also  जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषद २०२४ संपन्न, ७२ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या