बाणेर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त प्रभाग क्र. ९ सुस बाणेर पाषाण भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशाल गांधिले यांच्या जनसंपर्क कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी विशाल गांधिले, बाळासाहेब देशमुख, शैलेंद्र कदम, चैतन्य बनकर, निसर्ग गांधिले, पंकज जमदाडे, अशुतोष भुजबळ, ओंकार भोसले, ह्रिषीकेश गांगुर्डे आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
























