बाणेर येथे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळी पहाट प्रख्यात शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

बाणेर : बाणेर येथे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळी पहाट प्रख्यात शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५:०० वाजता
माऊली ग्राऊंड, माऊली पेट्रोल पंप शेजारी, बाणेर रोड, बाणेर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे. बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांसाठी खास सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.

दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांसाठी आयोजित प्रख्यात शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या संगीताचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयेश मुरकुटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची अंतर योग फाउंडेशन' ला सदिच्छा भेट